डिजिटल साक्षरता म्हणजे काय?

डिजिटल साक्षरता म्हणजे काय

संगणक स्मार्टफोन इंटरनेट सोशल मीडिया या डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिकण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्ये. “साक्षरता” हा शब्द सामान्यतः वाचन आणि लेखन कौशल्यांचा संदर्भ घेतो, जेव्हा तुम्ही त्याच्या आधी “डिजिटल” या शब्दाचा वापर करता, तेव्हा या शब्दात तंत्रज्ञान समाविष्ट होते. 

  • डिजिटल साक्षरता म्हणजे संगणक, स्मार्टफोन (मोबाईल डिव्हाइसेस), प्रिंटर,  आणि इंटरनेट यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे संवाद आणि माहिती शिकण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असणे.
  • डिजिटल साक्षरतेसाठी लोकांना इंटरनेटवर माहिती कशी शोधावी, स्त्रोतांचे मूल्यांकन कसे करावे आणि विविध स्वरूपांमध्ये दर्शविल्या जाणाऱ्या माहितीचे मूल्यांकन माहित असणे.

अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचे डिजिटल-साक्षरता टास्क फोर्स ही व्याख्या देते: “डिजिटल साक्षरता म्हणजे माहिती शोधणे, मूल्यांकन करणे, तयार करणे आणि संवाद करण्यासाठी माहिती आणि संवाद साधणे, तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता, ज्यासाठी संज्ञानात्मक आणि तांत्रिक कौशल्ये आवश्यक आहेत.”

उत्तर कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी (North Carolina State University) मधील साक्षरता आणि तंत्रज्ञानाचे प्राध्यापक हिलर स्पायर्स (Hiller Spires) यांच्या मते डिजिटल साक्षरतेचे तीन मुख्य घटक आहे: 

  1. डिजिटल सामग्री शोधणे आणि वापरणे
  2. डिजिटल सामग्री तयार करणे
  3. संवाद साधणे किंवा सामायिक करणे

डिजिटल साक्षरता

डिजिटल साक्षरते साठी काही आवश्यक मुद्दे


१. संगणकाचा वापर: 

या मध्ये संगणक कसे हाताळावे, ऑन, ऑफ, लॉगिन आणि पासवर्ड सेट करता येणे, फाईल / फोल्डर बनवणे, बदल करता येणे, आणि डिलीट करणे, आवश्यक असणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, अँटी-व्हायरस इन्स्टॉल आणि वापर करता येणे. 

२. इंटरनेट:

वेब ब्राउझर जसे Chrome किंवा  Mozilla Firefox इन्स्टॉल करता येणे, सर्च इंजिन  Google योग्य वापर करता येणे. माहिती शोधणे, आवश्यक सामग्री डाउनलोड करणे, वेबसाइट वर फॉर्म भरता येणे, शॉपिंग करणे, इत्यादी. इमॆल (Email) कसे करावे आणि ई-मेल आयडी शेयर करता आले पाहिजे. 

३. सॉफ्टवेअर  

अति आवश्यक असे सॉफ्टवेअर हाताळता येणे हे सध्याचा युगा मध्ये महत्वपूर्ण आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा ओपन ऑफिस: मध्ये  वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट (Word, Excel and Powerpoint) यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या सोबतच टायपिंग ची स्पीड असणे महत्वपूर्ण आहे. 

४. मोबाईल 

मोबाईल डिव्हाइसेस हाताळता येणे, मोबाईल लॉक, पासवर्ड सेट करणे, वायफाय (wifi) आणि मोबाईल डेटा कनेक्ट करता येणे.  अँड्रॉइड मोबाईल असेल तर फक्त प्ले स्टोर  (Play Store) मधून अति आवश्यक आणि माहिती असलेलेच  अँप डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे. 

५. सोशिल मीडिया (Social Media)

सोशल मीडिया चा वापर हल्ली वाढलेला आहे, WahtsApp, Facebook, Twitter, आणि Instagram. आपण काय शेयर करतोय आणि कोणाला, मेसेजेस करणे, फॉलो करणे आणि फोटो, विडिओ शेयर करणे, या बाबत जागरूकता असणे गरजेचे असते. बरेचदा आपण आपल्या निष्काळजी पण मुळे नुकसान होते. 

डिजिटल साक्षरता आता खरोखरच महत्त्वाची आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा विद्यापीठात तुम्हाला डिजिटल वातावरणातील लोकांशी संवाद साधणे, योग्य मार्गांनी माहिती वापरणे आणि नवीन कल्पना आणि उत्पादने एकत्रितपणे तयार करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डिजिटल लँडस्केप वेगाने बदलत राहिल्याने तुम्हाला तुमची डिजिटल ओळख आणि आरोग्य राखणे आवश्यक आहे. 

इंटरनेट वरील माहिती हि बरोबरच असेल असे नाही, तेव्हा आपण माहिती तपासून पाहणे आणि विश्वासु स्रोत आहे का याची सुद्धा काळजी घ्यावी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *